पुणे : कोथरुड येथील मेट्रोशेडच्या परिसरात लष्कराचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण केंद्र किंवा युनीट नाही, त्यामुळे संबंधीत गोळीबार प्रकरणाशी लष्कराचा संबंध नाही, असे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता "तो" गोळीबार नेमका कोणी केला, याबाबतचे गूढ आणखीनच वाढले आहे.(Who fired at Pune: Mystery grows after army's explanation)
कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे.संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरूवारी दुपारी पुन्हा मेट्रोशेडवर गोळीबार होऊन तेथे दोन ते तीन रिकामे काडतुसे आढळून आले, त्याचबरोबर मेट्रोच्या एका कर्मचाऱ्याच्या छातीलाही एक गोळी चाटून गेल्याची घटना घडल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी लष्कराशी पत्रव्यवहार करुन त्यांच्याकडे विचारणा केली असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. याविषयी लष्कराच्या जनसंपर्क विभागातर्फे अधिकृत प्रसिद्धि पत्रक जारी करण्यात आले. त्यामध्ये "कोथरूड येथील मेट्रो कार शेडच्या परिसरात लष्कराच्या कोणत्याही विभागाचे कुठलेही युनिट किंवा फायरिंग रेंज नाही. त्यामुळे सैन्याच्या गोळीबारामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाही.'' असे स्पष्ट केले आहे.
"त्या' गोळ्या "एसएलआर' व "एके 47'च्या
खुद्द लष्करानेच पोलिसांची शक्यता खोडुन काढल्याने आता "तो" गोळीबार नेमका कोणी केला, याबाबतचे गुढ अधिकच वाढले आहे. मेट्रोशेडच्या ठिकाणी आढळलेल्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या या "एसएलआर' व "एके 47' या रायफलमधील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा रायफल अन्य कोणाकडेही असण्याची शक्यता नाही. मेट्रो शेडच्या पलिकडेच चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दील "डिआरडीओ'चे फायरींग क्षेत्र आहे. त्यामुळे आम्ही "डिआरडीओ'ला यासंबंधी पत्र लिहीले आहे, असे कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी स्पष्ट केले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.