NCP  Sarkarnama
पुणे

Chinchwad By-election News : चिंचवडसाठी राष्ट्रवादीतील चौघे इच्छुक; आयात उमेदवाराच्या चर्चेने अस्वस्थता !

Pune NCP News : 'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले, भाजपकडून अश्विनी जगतापांनाच उमेदवारी मिळाली

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे `सरकारनामा`ने अगोदरच दिलेले वृत्त अखेर खरे ठरले. आता राष्ट्रवादीकडून तेथील उमेदवाराची आज घोषणा होऊ शकते. मात्र, तो निष्ठावंत की आय़ात असणार याविषयी मोठे औत्सुक्य आहे.

पक्षातील निष्ठावंतालाच उमेदवारी देऊन घड्याळावरच चिंचवड लढवावे ही या मतदारसंघातीलच नाही, तर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची भावना आहे. ती एक इच्छूक आणि माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी परवा अजित पवार यांनी घेतलेल्या इच्छूकांच्या मुलाखतीतही बोलून दाखवली आहे.

मात्र, त्याला तिलांजली देत अखरेच्या क्षणी पक्ष उमेदवार आयात करणार असल्याच्या आजच्या चर्चेने राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले. तसं झालं, तर आम्ही घरात बसू, पण आय़ात उमेदवाराचे काम करणार नाही, असे दुसऱ्या एका इच्छूकाने सांगितले.

कारण हा पवित्रा म्हणजे `आ बैल मुझे मार ` असून त्याचा आगामी पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर सुद्धा विपरित परिणाम होऊ शकतो, असे तो म्हणाला. तर आमच्या ११ पैकी वा पक्षातील इतर कुणालाही तिकिट दिले, तरी आम्ही एकजुटीने काम करू, असे तिसरा इच्छूक म्हणाला. त्यातून उमेदवार आय़ात करण्यास राष्ट्रवादीतूनच मोठा विरोध असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, उमेदवारी जाहीर करण्यात (पहलेआप`च्या शर्यतीत) युतीने (भाजप) बाजी मारली आहे. आघाडीने तो प्रथम जाहीर करावी, अशी वाट युती पाहत होती. मात्र, त्यांनी त्याला विलंब लावल्याने तसेच ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ती तशी करण्याचे प्रयत्न सोडून देत अखेरीस भाजपने आपले उमेदवार आज जाहीर केले. तर, परवा मुलाखती घेतलेल्या ११ पैकी नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर आणि मयूर कलाटे यापैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा शहर राष्ट्रवादीत सूर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT