Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar on Mahajan: युती सरकारच्या मंत्रिमंडळातील फिट मंत्री कोण? अजितदादांनी थेट नाव सांगत केलं कौतुक

Girish Mahajan : "इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सर्वात आधी घटनास्थळी कोण पोहचले असेल तर ते गिरीश महाजन आहेत".

सरकारनामा ब्यूरो

Pune News: "आमच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त फिट मंत्री कोण असेल तर ते गिरीश महाजन आहेत. त्यांचे वय साठीच्या पुढे गेले. मात्र, त्यांना कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेलेत", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या फिटनेसचे कौतुक केले. पुण्यात आयोजित महाआरोग्य शिबिरात अजितदादा बोलत होते.

"इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सर्वात आधी रात्री दोन वाजता घटनास्थळी कोण पोहचले असेल तर ते गिरीश महाजन आहेत. इर्शाळवाडीच्या टेकडीवर ते एकटे ट्रेकिंग करत गेले. त्यांनी त्यांचे आरोग्य फिट ठेवले. महाजनांचा दंड मी दाबून बघतो, ते खूप फिट आहेत", असे म्हणत अजितदादांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसचे कौतुक केले, आणि अशा प्रकारे तुम्हीही आरोग्य संभाळा, असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.

सध्या उपचाराचे खर्च खूप वाढत असल्याने सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही अजितदादांनी केले. 'आपला दवाखाना'साठी जवळपास 210 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगत लोकांसाठी जे करता येईल ते करत असून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या, राज्यातील सर्व जनतेचे आरोग्य चांगले राहावे हीच अपेक्षा असल्याचे अजितदादा म्हणाले.

आता सरकारी हॉस्पिटलमध्ये नागरिकांकडून एक रुपयाही घेतला जाणार नाही. यापुढे सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत, याबाबतचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही अजितदादांनी केल्या.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT