चास : खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात 3 लाख 23 हजार एक्कावन्न मतदारांपैकी 2 लाख 2 हजार 740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खेड तालुक्यात एकूण 62.76 टक्के मतदान झाले, यामध्ये 1 लाख 13 हजार 725 पूरूष मतदारांनी तर 89 हजार 15 महिला मतदारांनी मतदान केले. आता निकालाबाबत कमालीची उत्सुकता मतदारांमध्ये असून परिवर्तन घडणार की शिवसेना आपला बालेकिल्ला अबाधित ठेवणार याबाबत चर्चा सूरू झाली आहे.
मागील लोकसभेच्या निवडणूकीपेक्षा चालू वर्षी मतदानाबाबत मतदारांनी काहिसा निरूत्साह दाखवला. जनजागृती करूनही मतदार मतदान केंद्राकडे फिरकत नसतील तर हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. सलग तीन दिवस लागून मिळालेली सुट्टी व त्यामूळे मतदानापेक्षा प्रामूख्याने शहरी भागातील मतदारांनी फिरण्यास दिलेली पसंती की अन्य काही कारणे यामूळे मतदानाचा टक्का घटला असे म्हणता येईल.
उन्हाचा प्रचंड तडाखा यामूळे मतदानावर काही अंशी निश्चितच परिणाम झाला असला तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांमध्ये चांगला उत्साह जाणवला. सर्वच मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात दूपारी बारा वाजेपर्यंत व प्रामूख्याने सायंकाळी चारच्या पुढे मतदानाचा वेग वाढला व काही भागात मतदानासाठी मोठ्या रांगाही दिसून आल्या, शेवटच्या काही मिनीटांत तर मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याने सायंकाळी सहाची वेळ टळून गेल्यावरही मतदान करण्यात आले.
यंदा मतदारांची संख्या घटल्याने मतदानाचा टक्काही घटला आहे. सन 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात होते, यंदा मात्र हिच उमेदवारांची संख्या तब्बल तेवीसवर गेली आहे त्यामूळे मतांची विभागणी कशी होणार यावर प्रमूख उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. यंदा शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यात खरी लढत असली तरी इतर एकवीस उमेदवार रिंगणात असल्याने या एकवीस उमेदवारांचे मित्र परिवार, नातेवाईक, असलेला संपर्क यामूळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार, याशिवाय घटलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.