Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University  Sarkarnama
पुणे

Savitribai Phule Pune University : 'या' पाच जणांमधून कोण होणार पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू?

सरकारनामा ब्यूरो

सम्राट कदम

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत असलेल्या ११ उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला होता. या उमेदवारांमध्ये कुलगुरूपदासाठी चुरस होती. त्यातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे.तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा(Savitribai Phule Pune University ) च्या कुलगुरूपदाच्या तब्बल वर्षभर लांबलेली कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी १८ व १९ मे रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील पाच उमेदवारांची नावे अतिम मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. अधिकृतरित्या याची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर , विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील डॉ.संजय ढोले, पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे यातील एकाची कुलगुरूपदी(Vice Chancellors) निवड होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली आहे. डॉ. सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.१९) पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी सुध्दा मुलाखत दिली आहे. मात्र तत्पूर्वीच सोनवणे यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली.(Latest Marathi News)

अंतिम मुलाखतीचा टप्पा जवळ आल्याने पुढील काही दिवसातच विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहेत. त्यातही विद्यापीठातील विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकाची किंवा विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम करत असलेल्या व्यक्तीची कुलगुरूपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT