Indapur News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी किती टक्के मतदान झाले? याची आकडेवारी समोर आली आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 96.11 टक्के मतदान झाले आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागांपैकी बिनविरोध झालेल्या 4 जागा वगळता उर्वरित 14 जागांसाठी आज (ता.28) 96.11 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.गावडे यांनी दिली.
उद्या शनिवारी (ता.29) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बाजार समितीवर नेमकी कुणाची सत्ता येणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेपैकी अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी आमदार यशवंत विठ्ठल माने, व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागेसाठी दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा व हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेसाठी सुभाष ज्ञानदेव दिवसे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
तर उर्वरित 14 जागांसाठी शेतकरी विकास पॅनल व स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल या दोन्हीही पॅनलसह काही अपक्षांनी निवडणूक लढवली. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
चार हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इंदापूर बाजार समितीसाठी एकूण 4 हजार 322 मतदारांपैकी 4154 मतदान केले. यामध्ये 250 सोसायट्यांचे सोसायटी मतदारसंघातून 3 हजार 131 पैकी 2 हजार 996 मतदान झाले. तर 116 ग्रामपंचायतीच्या 1191 मतदारांपैकी 1158 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
70 वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क
दरम्यान, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पिंपरी खुर्द-शिरसोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कुसुम मोहन भोईटे (वय 70 वर्षे ) यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.
मतदान केंद्र नाव - एकूण मतदान - झालेले मतदान
इंदापूर - 450 - 430
वडापुरी - 511 - 490
बावडा - 605 - 582
निमगाव केतकी - 313 - 302
शेळगाव - 357 - 348
जंक्शन - 331 - 329
सणसर - 292 - 282
कुरवली - 447 - 412
पळसदेव - 488 - 472
भिगवन - 528 - 507
एकूण - 4322 - 4154 - 96.11 टक्के
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.