Pune News: राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. वळसे पाटील यांना सहकार खातं मिळालं आहे.
दिलीप वळसे पाटील हे अगोदर खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण, त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडल्यावरुन मोठं विधान केले आहे.
"काही लोकं विचारतात की तुम्ही पवारसाहेबांना का सोडलं पण शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही, कारण बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नाहीत असं म्हणत वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं नसल्याचे संकेत दिले आहे.
राजकरणात काही गोष्टी घडत असतात असे सांगत वळसेंनी पुलोद सरकारची आठवण करुन दिली. एकदा आपण पुलोद स्थापन केला, एकदा काँगेसमधून NCP स्थापन केली. त्याचप्रमाणे आज राजकरणात काही बदल झाला आहे. हा बदल परिस्थितीप्रमाणे हाताळायचा असतो. याचा अर्थ लगेच आपण साहेबांचे दुश्मन झालो, साहेब आपले दुश्मन झाले असं नाही. त्यांच्याबाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे, असे सांगत आपण आजही पवार साहेबांसोबत आहोत, असे वळसे पाटलांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलावली व त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. सरकारमध्ये जायचं ठरलं, मी कोणत्याही पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच आहे, असे वळसे पाटलांनी स्पष्ट केले. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होत. गेल्या दोन वर्षांत अजित पवार अर्थमंत्री सल्याने त्यांनी भरभरून निधी दिल्याने विकास कामे झाली, असे त्यांनी सांगितले.
आज विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून हे भावनिक मुद्दे मांडले जात आहेत. आज मी मंत्री मंडळात नसतो तर एवढी कोटी कोटी रुपयांची कामे एका एका गावात आली नसती. माझ्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा दोन चार कोटी निधी आलाच आहे. मंचरला 85 कोटी रूपये दिले. तिथे किती मतदान होते किंवा होईल, हे महत्वाचे नाही तर आपले मंचर सुधारलं पाहिजे हा त्यामागील हेतू आहे, असे वळसे पाटलांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.