Ajit Pawar News :
Ajit Pawar News : Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजितदादा गौतमीच्या कार्यक्रमाला येणार का? ; कार्यकर्त्यांनी धरला आग्रह..

सरकारनामा ब्यूरो

Pune News : विधानपरिषेदेतील विरोधीपक्षनेते अजित पवार आणि प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आज सायंकाळी पुण्याच्या खेड तालुक्यात कार्यक्रमांसाठी येत असल्याने अजित पवार आज गौतमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? अशी चर्चा होत आहे. अजित पवारांनी गौतमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करत आहेत. (Latest Marathi News)

मागील काही दिवसापूर्वी अजित पवारांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबाबत सल्ला देत खडसावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गौतमीचा कार्यक्रम आयोजित करू नये अशीही भूमिका अजित पवारांनी घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात बारामतीत गौतमीचा कार्यक्रम ठेवायचा का? असं म्हणतच अजित पवारांनाही गौतमीच्या कार्यक्रमाचे आकर्षण असल्याचे दिसून आले होते .

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (MLA Dilip Mohite Patil) यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजगुरुनगर येथे महाराष्ट्राचा हास्यजल्लोष हा कँमिडी शो आयोजित केला आहे. तर मोई येथे गौतमी पाटीलचा आर्केस्ट्रा देखील आयोजित केले आहे. या दोन्ही कार्यक्रमांची वेळ एकच असून सध्या अजित पवार राजगुरुनगर येथील हास्यजल्लोष या कॉमेडी कार्यक्रमाला येणार असल्याचे आयोजकांकडून जाहिर करण्यात आलं.

दरम्यान मोई गावात होणा-या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी यावं यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे आज अजित पवार हे गौतमी पाटील चा कार्यक्रमाला हजेरी लावणार का? अशी चर्चा खेड तालुक्यात सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT