Pune Politics
Pune Politics  sarkarnama
पुणे

Pune Politics : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? अजित पवारांनी दिले उत्तर

उत्तम कुटे: सरकारनामा

PCMC Politics : भाजपच्या पुण्यातील कसबापेठच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्या महिन्यात, तर याच पक्षाचे उद्योगनगरीतील चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे या महिन्यात कर्करोगाने निधन झाले. त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक करणार की नाही,याबाबत स्पष्ट भूमिका न मांडून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे (BJP) टेन्शन आज वाढवले.

मुदत संपण्य़ास पावणेदोन वर्ष असल्याने या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी ती लढण्याची शक्यता आहे. तसे संकेत अजितदादांच्या बोलण्यातून आज मिळाले.पिंपरी-चिंचवडमधील दोन खासगी रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी ते आले होते. त्यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी या पोटनिवडणुकीवर भाष्य केले. ती लागली नसल्याने त्याबाबत आताच चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची त्याबाबतची भुमिका अद्याप ठरली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,याअगोदर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपने घेतलेली भुमिका आणि परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय चर्चा करू घेऊ,असे सांगत त्यांनी भाजपचे टेन्शन वाढवले आहे.

गतवेळी आघाडीच्या जागावाटपात कसब्याची जागा कॉंग्रेसकडे होती. तर, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने शिवसेना बंडखोराला पुरस्कृत केले होते.दरम्यानच्या काळात या दोन्ही ठिकाणच्या राजकीय परिस्थितीत मोठा फरक पडला असून स्थित्यंतरही झाले असल्याकडे लक्ष वेधत किमान चिंचवडची जागा,तरी राष्ट्रवादी लढेल,असे अजितदादांनी यावेळी अप्रत्यक्षपणे सूचित केले.त्याचवेळी कारण नसताना पिंपरी-चिंचवड,पुण्यासह मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एक वर्षे पुढे गेल्याचे सांगत आता,मात्र त्या जाहीर केल्या पाहिजेत,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT