पुणे

Chhatrapati Sambhajinagar news: छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआ'ची सभा होणार की नाही? अजित पवारांनी दिले उत्तर

सरकारनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यानंतर एकमेकांवर दगडफेक, हाणामारी आणि पोलिसांसह इतर वाहनांच्या जाळपोळ करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.

यावेळी झालेल्या भांडणात समाजकंठकांनी पोलिसांच्या नऊ गाड्या जाळल्या. तर राममंदिरांच्या बाहेरची कमान जाळली. या हिंसाचारातील एकाचा मृत्यू झाला आहे. संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर संभाजीनगर मध्ये होणारी महाविकास आघाडीची सभा होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत असताना यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

मी काल (३० मार्च)नाशिक दौऱ्यावर होतो. संभाजीनगरच्या हिंसाचारावर भाष्य करणं चुकीच आहे. पण संभाजीनगरच्या जनतेने जर कोणी माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडू नका, कोणी दंगल घडवून आणण्याच्या प्रयत्न करतअसेल तर त्यांनाही खतपाणी घालू नका, आपल्याला जातीय सलोखा ठेवूनच यावर तोडगा काढावा लागेल असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.

तसेच मी जरी विरोधी पक्षात असलो तरी वातावरण बिघडेल असे कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करणार नाही. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करायला हवी, छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या. मी पुन्हा संभाजीनगर मधल्या तमाम बांधवांना आवाहन करेल, की कृपया माथी भडकून देण्याचे काम केलं तर त्याला कोणी ही बळी पडू नका. तिथली परिस्थिती अंबादास दानवे आणि इतर सहकाऱ्यांना माहिती आहे.

ही महाविकास आघाडीची सभा आहे. आमची दोन ताखरेची सभा आधीच ठरली होती. जे लोक माझ्या संपर्कात आहे. तिथे असा कोणताही निर्णय झालेला नाही. पोलिस यंत्रणांनी या सर्व गोष्टी कंट्रोलमध्य आणून आणि कायदा सुव्यवस्था राखून परिस्थिती पूर्ववत करावी, अशी विनंती मी तेथील पोलिसांना करावी.एकटा अजित पवार या बाबत निर्णय घेत नाही इतर नेते देखील निर्णय घेतात. मी काही बोललो तर ब्रेकिंग न्युज तयार होईल कारण तिथे सगळे नेते तयारी करत आहेत. ठरलेले कार्यक्रम व्हायलां पाहिजे असं मला वाटतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT