Ajit Pawar At Maan Taluka
Ajit Pawar At Maan Taluka Sarkaranama
पुणे

माण औद्योगिक कॉरिडॉर होणार?; काय म्हणाले, अजितदादा !

रूपेश कदम

दहिवडी : कोणी काहीही म्हणालं तरी, औद्योगिक काॅरिडाॅर माणमध्ये होणार म्हणजे होणारच हा माझा शब्द आहे! आम्ही शब्दाचे पक्के आहोत, असा विश्वास विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी माणच्या जनतेला दिला. मार्डी ता. माण येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पूर्वी शब्द दिला की बदलला जात नव्हता. पण आता अतिशय खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे. निष्ठा नावाचा प्रकार उरला नाही. कुणी अपक्ष म्हणून निवडून येतं काँग्रेस सोबत जातं, नंतर भाजपची कास धरतं. ही काय पध्दत आहे? म्हसवड काॅरिडाॅरबाबत १३ जुलै २०२० ला माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. तसेच सोळशीकरांचा विरोध असल्यामुळे आम्ही म्हसवडला काॅरिडाॅर होण्याबाबत आग्रही आहोत.

अजित पवार म्हणाले, कोणाला तरी पुढे करून माणचा कायापालट होणार नाही. आज यानिमित्त सांगतो की माणचं काम प्रभाकर देशमुख आणि मनोज पोळ हेच बघतील. त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी ताकदीने उभं राहायचं आहे. त्यांचं काही खटकलं तर आम्हाला सांगा. आपण सर्वांनी एकजुटीने राहायचं आहे. आपल्या माढा मतदारसंघातून व माण-खटाव मधून पवार साहेबांच्या विचाराचा घड्याळाचं चिन्ह घेवून उभा असलेला उमेदवारच निवडून द्यायचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT