Pune News : नुकतीच पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर महापौर कामाला लागले असून त्यांनी प्रशासनाला पहिला आदेश दिला आहे. तसेच दिलेले आदेश गांभीर्याने घ्यावेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
याबाबत नागपुरे म्हणाल्या, पुणे शहराच्या महापौर पदाची धुरा सांभाळल्यानंतर, शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि मूलभूत सुविधांना माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरी सुविधा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनाला काही आदेश दिले आहेत.
त्यानुसार शहरातील सर्व प्रमुख नाले आणि पावसाळी वाहिन्यांचे काम आणि साफसफाई येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अनिवार्य आहे.. या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर या कामांची दैनंदिन नोंद ठेवून त्याचा अहवाल महापौर कार्यालयास सादर अशा देखील सूचना नागपूरे यांनी दिल्या आहेत.
गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टीचा अनुभव घेता पुणे शहरातील काही भागात आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत असून पुराचा धोका अधिक आहे. अशा ठिकाणांची प्रशासनाने अशा 'हॉटस्पॉट्स'ची यादी अद्ययावत करून तिथे पाणी साचू नये म्हणून आतापासूनच उपाययोजना करून 'पंपिंग स्टेशन्स' आणि इतर आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. येत्या आठवड्यात मी स्वतः या भागांची पाहणी करणार असून, त्यावेळेस संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी असं मंजुषा नागपूरे यांनी सांगितला आहे.
तसेच नदी सुधार प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीचा आणि पावसाळ्यातील सुरक्षेचा सविस्तर अहवाल येत्या 3 दिवसांत माझ्या कार्यालयात सादर करावा. पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन अपघात टाळण्यासाठी नवीन खोदकामास परवानगी देण्याची तारीख निश्चित करावी. सुरू असलेली कामे तत्काळ पूर्ण करून रस्ते पूर्वस्थितीत आणावेत. सदर विषयांचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करावी. या संदर्भातील आढावा बैठक मी लवकरच बोलावणार आहे. असल्यास देखील मंजुषा नागपुरे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.