Wrestler Rahul Aware Gives Two Lack Rupees to CM Fund
Wrestler Rahul Aware Gives Two Lack Rupees to CM Fund 
पुणे

कुस्तीगीर राहुल आवारेने 'कोरोना' विरोधात थोपटले दंड

संपत मोरे

पुणे : राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे यांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी दोन लाखाची वैयक्तिक मदत दिली आहे. आज सकाळी त्यांनी ही रक्कम दिली आहे.

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर मदत करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. राजकीय नेते, कॉर्पोरेट क्षेत्र, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून लोकांना मदत दिली जात आहे. सरकारला उपाययोजना करण्यासाठी निधी दिला जात आहे.

राहुल आवारे सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्यक्तीगत रित्या दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आज सकाळी दिले. राहुल आवारे मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील आहेत. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आवारे यांनी कष्टाच्या बळावर राष्ट्रकुल सुवर्णपदकाचा मानकरी होण्यापर्यंत वाटचाल केली आहे. सध्या ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT