Zilla Parishad Pune
Zilla Parishad Pune 
पुणे

Zilla Parishad च्या आधीच्या परिक्षा रद्द, आता नव्याने होणार भरती

सरकारनामा ब्युरो

Zilla Parishad Bharati पुणे : जिल्हा परिषदेतील क वर्गीय महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही भरती ग्रामविकास विभागाने शुक्रवारी (ता.२१) रद्द केली. जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) क वर्गीय रिक्त पदांच्या भरतीसाठी जानेवारी २०२३ मध्ये नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्थगित असलेली जिल्हा परिषद नोकर भरतीची मार्ग आता मोकळा झाला आहे.

तसेच, गेल्यावेळी झालेल्या या दोन्ही भरती प्रक्रियेसाठी अर्जदारांना त्यांचे परीक्षा शुल्कही जिल्हा परिषदेकडून (Zilla Parishad) परत केले जाईल, असे राज्याच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना तसे आदेशही दिले आहेत. शुक्रवारी पुणे जिल्हा परिषदेला याबाबत आदेश मिळाला.

तर नव्या जाहिरातीसाठी सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला जाईल. हा नवा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर ग्रामविकास विभाग पुन्हा नव्याने या रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सुधारित आकृतिबंध मंजूरीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान आता ही भरती प्रक्रिया आता पूर्वीसारखीच जिल्हा परिषदेच्या पातळीवरच राबवली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

यापूर्वी जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती दरवर्षी व्हायची आणि त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरच ही भरती प्रक्रिया राबवली जायची. आता सध्या जिल्हा परिषदेत क संवर्गातील विविध प्रकारची १८ पदे आहेत. यापैकी आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तर सर्व संवर्गातील क वर्गीय रिक्त पदे ही सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतरच भरावीत, असे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT