ATS News Sarkarnama
पुणे

Pune ATS News: झुल्फिकार बडोदावालाकडून मिळत होती पुण्यातील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद

Pune Crime News : दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी, ११ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्यातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या संदर्भातील अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता राज्य दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासात त्यांना पैसे पुरवणारी व्यक्तीही सापडली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेला झुल्फिकार बडोदावाला दहशतवाद्यांना पैसे पुरवीत होता. ही बाबा एटीएसच्या (ATS) तपासातून स्पष्ट झाली आहे.

दहशतवाद्यांना पैसे पाठविणारा मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझी याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बडोदावालावर कारवाई करण्यात आली आहे. बडोदावाला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आत्तापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली आहे.

बडोदावालाला बुधवारी (ता.२) सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. बडोदावाला याने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले. त्याने या दोघांशी वेळोवेळी संपर्क देखील साधला आहे. त्याला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली? त्याने नेमकी किती रक्कम दहशतवाद्यांना दिली? या सर्वांचा तपास करण्यासाठी त्याला एटीएस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला.

सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी बडोदावालाला ११ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पोलीस आणि एटीएसने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा), दहशतवाद्यांना आश्रय देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा), आर्थिक रसद पुरविणारा सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कोंढवा) यांना अटक झाली आहे. या सर्वांना पाच ऑगस्टपर्यंत न्यायालयाने (Court) एटीसएस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT