Dayanand Irkal  Sarkarnama
पुणे

Pune News : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची वकील महिलेला मारहाण; चित्रा वाघ यांनी या प्रकरणाला फोडली वाचा

Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली

सरकारनामा ब्यूरो

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वकील युवतीला गलिच्छ शिवीगाळ करत भर रस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे दयानंद इरकल हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. तसेच तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दयानंद इरकल यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, आरोपीला बेड्या ठोकायला पुणे शहर पोलिसांना कुणाची वाट पाहावी लागतेय? असा सवाल उपस्थित करत आरोपीला तात्काळ अटक करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

''पुणे शहरातील एक वकील युवती रस्त्याने जात होती. यावेळी पुढे एक गाडी जात होती. ती गाडी हळू-हळू जात असल्याने त्या युवतीने आपली गाडी त्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे घेतली. मात्र, त्यानंतर त्या गाडीतून एक माणुस बाहेर आला आणि त्या मुलीशी दुरव्यवहार केला.''

''तिला स्फर्श करत किळसवाणा प्रकार केला. तेसच त्या माणसाच्या बरोबर असणाऱ्या एका महिलेनेही त्या मुलीला चपलेने मारले. शिव्या दिल्या. पण हे कोण होते? तर हे पुणे शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल होते'', असं चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, ''हे शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे. येथे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. एवढा संतापजनक प्रकार घडला असताना पोलिसांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी या प्रकारावरून पुणे पोलिसांनाही धारेवर धरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT