Gambling In Patan taluka
Gambling In Patan taluka 
राज्य

गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात जुगार अड्ड्यांवर कारवाई, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

सरकारनामा ब्यूरो

मल्हारपेठ (ता. पाटण, जि. सातारा) : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ही मोठ्याप्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यांनी मध्यंतरी पोलिसंना अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले असले  तरीही पाटण तालुक्यात जुगाराचे अड्डे जोरात सुरू असून गारवडे (ता. पाटण) येथे जुगार अड्डयावर पाटण पोलिसांनी छापा टाकून एक लाख तीन हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच  १२ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. 

गारवडे गावच्या हद्दीत लोहाराचा माळ नावाचे शिवारात म्हसोबा देवस्थानच्या शेतातील झाडाखाली तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाटण पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली.

काल (शुक्रवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारारास पाटण पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यात एक लाख तीन हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १२ जणांवर गुन्हा नोंद केला. याप्रकरणी भगवान रामचंद्र यादव (वय ५२), गजानन बाळकृष्ण शिंदे (४६), साहेबराव दिनकरराव पाटील (५९), अशोक तुकाराम पाटील (६५), बाबुराव पांडुरग पाटील (४५), अशोक मारूती लोहार (६२), गोरख रघुनाथ यादव (३0) , वैभव पांडुरग लोहार, किरण दिलीप यादव, साहेबराव दिनकर कदम, अशोक जाधव -चाफळकर, दादासो सर्जराव यादव (सर्व रा. गारवडे) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात सार्वजनिक व खाजगी ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र न येण्याचे आदेश आहेत. तरीही संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक उपद्रव प्रसार करून बेकायदा बिगर परवाना तीनपानी पत्त्या जुगार खेळत असताना आढळून आल्याप्रकरणी छापा मारुन जुगार साहित्य, रोख  रक्कम, मोटारसायकल असा एक लाख तीन हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिस उपाधिक्षक अशोकराव थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक तृप्ती  सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, हवालदार पगडे, मोरे, पवार यांनी छापा टाकुन मुद्देमाल ताब्यात घेतला. पाटण पोलिस ठाण्याचे हवालदार अतुल लोंढे  यांनी त्याबाबतची फिर्याद दिली असून मल्हारपेठ पोलिस दुरक्षेत्रात १२ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

पाटण तालुका हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा तालुका असून त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही पाटण तालुक्यात जुगाराचे अड्डे जोरात असल्याचे चित्र आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT