Uddhav Thackeray & covid 19 

 

Sarkarnama

राज्य

चिंता वाढली: राज्यात आज दिवसभरात आढळले ८ हजार कोरोना रुग्ण

राज्यातील कोरोना (Covid-18) रुग्ण मृत्यूदर २.११ टक्क्यापर्यंत पोचला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Covid-19) संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यातीस मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य महानगरामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधीतांची संख्या आढळत आहे. आज (ता.31 डिसेंबर) दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे गेल्याने चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात राज्यातील विविध भागात ८ हजार ६७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ करोनाबाधितांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका असून आज १ हजार ७६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ सुमारे ९.६८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. काल (ता.30 डिसेंबर) देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुमारे 3 हजार 900 रुग्ण आढळले होते. तर, पुण्यात आज ४१२ नवीन करोनाबाधित आढळले असून, १ हजार ७९९ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

दिवसेंदिवस राज्यात ओमीक्रॉन रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. आज राज्यात चार ओमीक्रॉन रूग्ण आढळले आहेत. यामध्ये वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमीक्रॉन बाधित आढळला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमीक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचा तपासणी अहवाल आला असून यापैकी १५७ रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्यशासनाने खबरदारी म्हणून काही निर्बंध घातले आहेत. अशीच रूग्णसंख्या वाढल्यास कठोर कारवाईचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिले आहे. तसेच, कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करत 15 ते 18 वयोगटाचे लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी काल सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT