balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg 
राज्य

स्वतःचाच फ्लेक्‍स आधी हटवून थोरातांकडून संगमनेरमध्ये कारवाई 

आनंद गायकवाड

संगमनेर : गेल्या काही वर्षात संगमनेर शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या फ्लेक्‍सची रेलचेल झाल्याने शहराची ओळख फ्लेक्‍सचे शहर अशी होऊ लागली. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या या फलकांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई सुरू केली. आधी स्वतःचे छायाचित्र असलेला नववर्ष शुभेच्छेचा फलक काढून या उपक्रमास प्रारंभ केला. 

संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला राज्यातील हायटेक बसस्थानक उभारले आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या बसस्थानकाच्या परिसरात लागलेल्या अनेक लहानमोठ्या फ्लेक्‍सच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची बाब थोरात यांना जाणवली. बसस्थानकावर थांबून त्यांनी स्वतःचे छायाचित्र असलेला फलक हटविला. संगमनेर बसस्थानकाचा मध्यवर्ती परिसर सर्व प्रकारच्या जाहिरातींचे केंद्र बनला आहे. आज या प्रकाराची महसुलमंत्र्यांनीच दखल घेतल्याने तातडीने सूत्रे हलली. बसस्थानक परिसरातील फलकापासून सुरवात झाली. 

गणेशनगर, सह्याद्री कॉलेज, नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगर रोड, दिल्ली नाका या सर्व ठिकाणी लावलेले फलक आगामी दोन दिवसात काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषदेच्या सशुल्क परवानगी शिवाय फलक लावण्यास बंदी घालण्यात येणार आहे. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदींसह नगरपरिषदेचे बाळू कुळधरण, राजेंद्र सुरग, अखलाक शेख, कैलास अभंग आदी उपस्थित होते. या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. 

Edited By - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT