nanded district grampanchyat adminsitrator appoint news
nanded district grampanchyat adminsitrator appoint news 
राज्य

नांदेड जिल्ह्यातील अठरा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

जगदीश पानसरे

औरंगाबादः नांदेड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १८ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अधिकारात प्रशासंकाची नियुक्ती केली आहे. जुलैमध्ये मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोरोना संकटामुळे घेता येणे शक्य नसल्यामुळे राज्यातील अशा सर्वच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या सरकारी निर्णयाविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलैच्या न्यायालयीन आदेशानूसार प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सुरूवातीला ग्रामविकास खात्याने स्थानिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेनूसार जिल्हा परिषदेच्या सीईओंनी योग्य व्यक्तीची निवड प्रशासक म्हणून करावी, असे आदेश देण्यात आले होते.

परंतु यावरून मध्यंतरीच्या काळात बराच वाद झाला, पालकमंत्री किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ योग्य व्यक्ती कसा ठरवणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील या निर्णयाला आक्षेप घेतला होता. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात देखील सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

या सगळ्या घडामोडींनंतर आता शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच ग्रामपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी २८ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १८ ग्रामपंतायतींचे प्रशासक नियुक्त केले आहेत.

यात हदगांव, किनवट, माहुर, भोकर, बिलोली, धर्माबाद, नायगांव खै, व मुखेड तालुक्यातील नेवरवाडी, पाथरड, चिखली ई, आष्टा, सेलू, आमदरी, डोरली पा, नारवट, पांडुर्णा, रिठा, ताटकळवाडी, वाकद, हरनाळ-ममदापूर, चिंचोली, धानोरा खु, भोपाळा, टाकळी बु. व बापशेटवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत ही ११ ते २८ जुलै दरम्यान संपली आहे. 

ग्रामपंचायत व प्रशासक

नेवरवाडी- पी.के.सोनटक्के (वि.अ.)
पाथरड- आर. एम. लोखंडे (वि.अ.)
चिखली ई- एस.आर. शिंदे (वि.अ.)
आष्टा - डी.व्ही.जोगपेटे (वि.अ.)
सेलू- ए.जी. झाडे (वि.अ.)
आमदरी- व्ही.बी.कांबळे (वि.अ.)
डोरली पा.-व्ही.बी.कांबळे (वि.अ.)
नारवट- आदिनाथ मादसवार (वि.अ.)
पांडुर्णा- आदिनाथ मादसवार (वि.अ.)
रिठा- डी.के.पाटील (वि.अ.)
ताटकळवाडी- डी.के.पाटील (वि.अ.)
वाकद - एस.आर.पांचाळ (वि.अ.)
हरनाळ-ममदापूर- पी.आर.मुसळे (वि.अ.)
चिंचोली- संजय मिरजकर (वि.अ.)
धानोरा खु.-आर.डी.जाधव (वि.अ.)
भोपाळा- शेख लतिफ (वि.अ.)
टाकळी बु.- एस.आर.कांबळे (वि.अ.)
बापशेटवाडी-एस.व्ही. येवते (वि.अ.)


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT