मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज (ता.11 मार्च) अधिवेशनात सादर केला. राज्यात विकासाची पंचसूत्री राबविणार येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) होता. या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि न्यायालयीन सुनावणीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नसल्याने अद्यापही संप मिटला नाही. दरम्यान, राज्य सरकारने चर्चेच्या मधल्या टप्प्यावर एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी वेतन हमी आणि वेतन निश्चितीची अट मान्य करूनही संपावर असलेले एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत यामुळे संप अद्याप संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या परिवहन विभागासाठी (MSRTC) ३ हजार ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आल्याने यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. याबरोबरच एसटी बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी व त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, असेही पवारांनी जाहीर केले. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ३ हजार पर्यावरणपूरक बसेस एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
याचबरोबर वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेसाठी राज्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत विविध उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोलीमध्ये नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव देखील आहे. २०२५ पर्यंत राज्यात विद्युत वाहनांसाठी ५ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.