Bjp Mla Sambhji Patil Nilangekar wish Devendra Fadanvis News Latur 
राज्य

..अन् फडणवीसांनी जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी देण्याचा निर्णय तीस सेंकदात घेतला

अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पोखरासारख्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहेत.

(संभाजी पाटील निलंगेकर, भाजप आमदार, निलंगा विधानसभा)

निलंगा ः राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय दूरदृष्टी असलेले नेतृत्व. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात.  शेती, उद्योग अशा क्षेत्रात विविध योजनाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांगीण विकास काय असतो हे दाखवून दिले. (..And Fadnavis decided to give 1 crore to the families of the soldiers in thirty seconds, Said Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar) मी माजी सैनिक खात्याचा मंत्री असतांना शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी दिली जाणारी पाच लाखांची तुटपुंजी मदत त्यांनी थेट १ कोटी केली. विशेष म्हणजे हा निर्णय फक्त अर्ध्या मिनिटात घेतला, माझ्या कार्यकाळात हा निर्णय झाला याचा मला विशेष अभिमान आहे.

कुठलेही क्षेत्र असो धडाडीने निर्णय घेण्यात फडणवीसांचा हातखंडा होता. पुर्वी उद्योग क्षेत्र हे शहराभोवतीच मर्यादीत असायचे, मात्र याचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना कसा उपयोग होय होईल याचे धोरण आखून त्यांनी अनेक महत्वपुर्ण  निर्णय घेतले. ( Bjp Leader Devendra Fadanvis, Maharashtra) अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पोखरासारख्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहेत.  वाढती लोकसंख्या व अनेक जमीनदार शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र कमी झाल्यामुळे शेतकरी हा अल्पभूधारक झाला, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, या हेतूने त्यांनी पोखरा सारख्या योजना राबवल्या.

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर व प्रगतशील राज्य असले तरी या महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांचे जीवन, आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे म्हणून त्यांनी शहरांमधील औद्योगिकरण ग्रामीण भागापर्यंत पोहचवले.  देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते, महाराष्ट्राला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचे काम उद्योगधंद्याच्या माध्यमातून फडणवीस यांच्या काळात झाले.  

या पूर्वीचे व्यवसाय केवळ मुंबई आणि मुंबई पूरतेच मर्यादित होते,  त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी अनेक उद्योगधंदे मुंबईबाहेर इतर अविकसित शहर, तालुक्यात नेत छोट्या शहरांना देखील विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचे काम केले.  मुख्यमंत्री असतांना  विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात राज्यात आणण्यात देखील त्यांना यश मिळाले.  यामुळे भविष्यात आपल्या राज्यातील उच्चशिक्षित तरुणांना इथेच रोजगार मिळावा, ही त्यांची या मागे भावना होती.

असा झाला मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात अग्रेसर होता.  व्यवसाय आणि रोजगार वाढीच्या दृष्टीने त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.  देवेंद्र फडणीस हे अतिशय सहनशीलता, मनमिळावू स्वभावाचे व अभ्यासू नेते आहेत. त्यांच्या स्वभाव, गुणधर्मांचा अनुभव आणि सहवास मला सहकारी म्हणून घेता आला.  एखाद्या विषयाची विस्तृत व सविस्तर मांडणी करतांना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आत्मविश्वास असतो. शांतपणे आपले मुद्दे मांडत समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

राजकारण असो की समाजकारण योग्य व्यक्तीच्या पाठीशी ते कायम खंबीरपणे उभे राहतात. मग त्याच्या परिणामांची चिंता कधी त्यांनी केली नाही.  मराठवाडा विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळाची परिस्थिती असतांना ते  मुख्यमंत्री म्हणून दौऱ्यावर आले होते.  अचानक त्यांच्या गाड्यांच्या ताफा एका रस्त्यालगतच्या शेतासमोर थांबला. त्यांना शेतात काही भागात हिरवळ असल्याचे दिसले.  सगळीकडे भयानक दुष्काळीची स्थीती अन् इथेच हिरवळ कशी? या उत्सूकतेपोटी ते थांबले.

प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांनी शेततळे करून पाण्याचा मोठा साठा केल्याचे त्यांनी पाहिले. या पाण्यामुळेच दुष्काळातही शेत हिरवे होते हे त्यांच्या लक्षात आले.  त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यावर थांबून थेट शेततळ्या वरूनच 'मागेल त्याला शेततळे देण्याचे आदेश दिले होते. एखाद्या गोष्टीचे महत्व ओळखून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची त्यांची ही कार्यपद्धती विलक्षण आहे. असे अनेक लोकोपयोगी निर्णय त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतले. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना फडणवीस यांच्यात ओतप्रोत भरलेली आहे, त्यांच्या या गुणामुळेच मी त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकलो. 

माझ्या काळात निर्णय, याचेच समाधान..

माझ्याकडे माजी सैनिक कल्याण खाते होते, तेव्हा शहीद जवानांच्या कुटुंबियांना पूर्वी केवळ पाच लाख रुपये मदत  दिली जायची. इतर राज्य आपल्यापेक्षा अधिक मदत देत असल्याने  त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार व्हायचा.  प्रगतशील महाराष्ट्राकडून देखील शहीद जवानांच्या कुटुंबाना दिली जाणारी मदत वाढवली पाहिजे, अशी मागणी मी मंत्री म्हणून त्यांच्यांकडे केली. 

यावर केवळ ३० सेंकदात फडणवीस साहेबांनी शहीद जवानांच्या वारसांना एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.  या गोष्टींचा मला सार्थ अभिमान आहे, हा निर्णय आपल्या काळात झाल्याचे समाधान देखील वाटते. शहीद जवांनांचा त्याग, समर्पण भावाना याची जान असलेल्या फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न लावता जाहीर केलेली ही मदत त्यांच्यातील राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम दर्शवते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT