Sarkarnama Banner
Sarkarnama Banner  
राज्य

...अन् यशोमती ठाकूर यांनी पोलिस कर्मचाऱ्याला ठोकला कडक सॅल्यूट !

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : मंत्र्यांच्या बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी, वाहनचालक हे नेहमी त्यांच्या सेवेत असतात. त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ते चोखपणे पार पाडत असतात. बरेचदा त्यांना त्यासाठी पुरस्कृतही केले जाते. पण आज राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर Minister Yashomati Thakur यांनी आपल्या ताफ्यातील निवृत्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सॅल्यूट ठोकून अनोख्या पद्धतीने त्याचा सन्मान केला. She saluted to police officer in a unique way. 

मंत्री ठाकूर यांच्या ताफ्यातील वाहनचालक मारुती किन्हाके सेवानिवृत्त झाले. त्यांनी निरोप देताना यशोमती ठाकूर यांनी मारुती यांना सॅल्यूट ठोकला आणि येवढेच नव्हे तर त्यांचे औक्षण करून वाकून त्यांना नमस्कार केला. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छाही दिल्या. मंत्री ठाकूर यांनी आपल्या ताफ्यातील निवृत्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा ज्या पद्धतीने सन्मान केला, हे बघून तेथे उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. 

मंत्री जरी असल्या तरी एक माणूस म्हणून आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान कशा पद्धतीने राखला जाऊ शकतो, याचे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. मात्र मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किन्हाके यांना सॅल्यूट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या म्हणून ते आजपर्यंत सारथ्य करीत होते. मारुतीराव यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव श्रीमती ठाकूर यांनी केला तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

७.७.१९८९ रोजी पोलीस सेवेत भरती झालो. ७.७.२०२१ रोजी माझ्या सेवेचे ५८ वर्ष पूर्ण झाले. आज मी पोलिस सेवेतून निवृत्त होत आहे. त्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माझे औक्षण करून माझ्या कामाचा गौरव केला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
- मारुती किन्हाके
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT