anna-hazare--7-may-ff.jpg
anna-hazare--7-may-ff.jpg 
राज्य

लाॅकडाऊनच्या काळात अण्णा हजारे यांनी हे केले महत्त्वाचे काम

मार्तंड बुचुडे

पारनेर : लॉकडाऊनच्या काळातही जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यामातून देशातीलच नव्हे, तर थेट देशाबाहेरील जनतेबरोबर तसेच आपल्या कार्यकर्त्यांशी विविध विषयावर सवांद साधला आहे. सारे जग लॉकडाऊनमध्ये बंदीस्त झाले असले, तरीही हजारे मात्र आपल्या दहा बाय दहाच्या खोलीतूनही देशातील व जगातील जनतेशी संवाद साधत  आहेत.

हजारे यांच्या माध्यामातून देशालाच नव्हे, तर जगाला जलसंधारणाचे महत्व समजले आहे. त्यांच्या आंदोलनाच्या माध्यामातून भारतीय जनतेला माहिती अधिकारासह द्पतर दिरंगाई सारखे अनेक उपयुक्त असे  कायदे मिळाले आहेत. त्यामुळे राळेगणसिद्धी हे विविध विषयावरील ज्ञान व माहिती देणारे माहितीपीठ व देशातील एक उत्कृष्ट असे पर्यटणस्थळ बनले आहे.

हजारे यांनी लॉकडाऊनच्या काळात देशभरातील विविध राज्यात व देशाबाहेरही सुमारे 12 ठिकाणी ऑनालाईन परिसंवाद घेतले आहेत. त्यातील एक परिसंवाद ऑस्टेलियामधील विद्यापीठात झाला आहे. देशात व राज्यात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाले. राळेगणसिद्धी येथेही 22 मार्चला ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन लॉकडाऊन जाहीर केले. गावाबाहेरील पर्यटकांना गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईपर्यंत गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गेली 13 वर्षात राळेगणसिद्धी गावाला सुमारे नऊ लाखाहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. मात्र कोरोनामुळे गेली सात महिने गाव पर्यटकांविना सुनेसुने झाले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांनी राळेगणसिद्धीचा परिसर पाहण्याबरोबरच हजारे यांचे मार्गदर्शनही घेतले. हजारे यांनी गेल्या 13 वर्षात देशातील अनेक राज्यात व देशाबाहेबरही जाऊन पाणलोटविकासाचे मार्गदर्शन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात हजारे यांनी परदेशातील ऑस्टेलियामधील ऑस्टेलिया युनिर्व्हसिटी मधील मुलांसमावेत ग्राविकास या विषयावर सुमारे दीड तासाहून अधिक काळ संवाद साधला आहे. तसेच मुंबईच्या गुरूकुल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आण्णांचे जीवन कार्य व प्रेरणा या विषयावर परिसंवादात झाला आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युथ पार्लमेंट, राज्यस्थानमधील गोरखपूरच्या कार्यकर्त्यांशी, त्याचबरोबर छतपूर (मध्यप्रदेश), पुण्याच्या स्वामी विवेकानंद केंद्रात, आदर्शगाव पिंपलांत्री (राज्यस्थान ), आमरावती महाविद्यालय, देशभरातील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालये, आदी ठिकाणी झालेल्या परीसंवादातून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच योगा दिनानिमित्ताने माधवबाग येथे योगा दिनाचे उदघाटन व मार्गदन हजारे यांनी याच काळात केले होते.

प्रत्येक महिन्यास 20 हजाराहून अधिक किलोमिटरचा प्रवास करणारे हजारे यांचा प्रवास गेली आठ महिने थांबला असला व लॉकडाऊनमुळे  हजारे यांचा मुक्काम राळेगणसिद्धीतच असला तरीही त्यांचे मार्गदर्शन व परिसंवाद सुरूच आहे.

कोरोनाच्या काळात पोलीस दल एकही दिवसाची सुट्टी न घेता 24 तास काम करत आहे. याही स्थितीत हजारे यांच्या मार्गदर्ऩामुळे छतरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक अगळावेगळा उपक्रम राबविला आहे. तेथील गावांगावामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून जाऊन त्या गावातील वयोवृद्ध तसेच निराधार कुटुंबांचा शोध घेतला व त्यांना औषधांसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला, या उपक्रमाचे संपुर्ण मध्यप्रदेशात कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT