Ncp Warn bjp Leader Pravin Darekar News Aurangabad 
राज्य

दरेकर माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे तोंडाला वंगण फासू..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अशा गोष्टींना पाठिंबा आहे का? असा सवाल देखील सलगर यांनी या निमित्ताने केला.

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद ः विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस व महिलांबद्दल असभ्य शब्द वापरल्यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या महिलांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. (Apologize to everyone, otherwise you will get your mouth greased.) राज्यभरात दरकेर यांच्याविरोधात महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतांना राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसने देखील दरेकर यांना सज्जड दम भरला आहे.

माफी मागा, नाहीत तोंडाला वंगण फासू, असा इशारा युवती प्रदेशाध्यक्ष सक्षण सलगर यांनी दिला आहे. (Ncp Youth Wing Chief Sakshna Salgar,Osmanabad) पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कार्यक्रमात बोलतांना प्रविण दरेकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केले होते.

यावरुन राष्ट्रवादीने त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. (Bjp Leader Pravin Darekar) या संदर्भात सक्षणा सलगर म्हणाल्या, तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते पद दिलं गेलंय, महिलांचे चारित्र्यहनन करण्यासाठी नाही?

महिलांबद्दल बोलतांना तुम्ही राज्याचे वरच्या सभागृहातील विरोधी पक्षनेते आहात याचे भान ठेवायला हवे होते. भाजपचे नेते सतत महिलांच्या विरोधात वक्तव्य करत असतात. या आधी आमदार राम कदम यांनीही `कोणतीही मुलगी आवडली तर तिला उचलून आणा`, अशी संतापजनक भाषा केली होती.

भाजपचे नेते, आमदार अशा प्रकारे महिला, मुलींबद्दल बरळत असतांना त्यांना आवर घातला जात नाही. राज्याचे विधान सभेतील भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अशा गोष्टींना पाठिंबा आहे का? असा सवाल देखील सलगर यांनी या निमित्ताने केला आहे.

दरेकर यांनी या विधानाबाबत माफी मागितली नाही, तर ते ज्या जिल्ह्यात जातील तिथं युवती कार्यकर्त्यां त्यांच्या तोंडाला वंगण लावतील,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT