TET Exam Scam News Sarkarnama
राज्य

TET Exam Scam : जी.ए. सॉफ्टवेअरच्या संचालकाने सुपेंना दिले होते ३० लाख रुपये

टीईटी (TET) बनावट प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळालेले १८ विद्यार्थी कोण आहेत?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना २०१८ साली टीईटीची परीक्षा (TET Exam) घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार (Ashwinkumar-Shivkumar) याने ३० लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. शिवकुमार याने जबाबात ही माहिती पोलिसांना दिली आहे. (TET Exam Scam News)

या गुन्ह्याच्या तपासासाठी सुपे (वय ५८, रा. पिंपळे गुरव) आणि परीक्षा घेणाऱ्या जी. ए. टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचे एजंट संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) व अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे. २०१८ साली झालेल्या टीर्इटी परिक्षेच्या निकालाबाबत राज्य परिक्षा परिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर त्यानंतर जबाबदार पदावर काम करीत असताना सुपे यांनी कोणतीही ठोस कारवार्इ केला नाही. संतोष हरकळ याच्या विद्यार्थ्यांच्या यादीमधील १८ परीक्षार्थींना गुणपत्रक न मिळाल्याने शिवकुमार याने त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची रंगीत प्रिंट काढून मुंबर्इतील एका एजंटला नेवून दिली, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

बनावट प्रमाणपत्र आल्यानंतर सुपे यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही? प्रमाणपत्र मिळालेले १८ विद्यार्थी कोण आहेत? तसेच, तपासादरम्यान पुढे आलेल्या विविध बाबींचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. न्यायालयाने आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

देशमुख याने संतोष आणि अंकुश हरकळ यांच्यामाध्यमातून बुलढाणा, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, पुणे, मुंबई येथील वेगवेगळे एजंट, क्लासचालक यांच्याशी संपर्क साधत पेपरफुटी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सुपे यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक सुनील घोलप याने त्यांच्याकडे आलेल्या परीक्षार्थींची नावे व हॉलतिकीटची माहिती त्याच्या मोबाईल व्हाटसअपवरुन देशमुखच्या व्हॉटसअपवर पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. देशमुख याने गैरव्यवहारातून प्राप्त केलेल्या रकमेतून वर्धा येथे शेतजमीन तसेच चारचाकी वाहन खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतिश देशमुख, अश्विनीकुमार शिवकुमार यांच्यासह इतर शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि साखळीतील इतरांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT