Gondia BSP.
Gondia BSP. 
राज्य

बसपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांवर केले गंभीर आरोप

Abhijeet Ghormare

गोंदिया : बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष दुर्वास भोयर यांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचे अपहरण केल्यानंतर बलात्कार आणि नंतर खून करण्यात आल्याचा आरोप भोयर दाम्पत्याचा आहे. याप्रकरणी पोलिस प्रकरण दाबत असल्याचा आरोप करीत या दाम्पत्याने आज पोलिसांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 
 
भोयर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची १४ वर्षीय मुलगी १२ जानेवारीला मित्रांसोबत फिरायला गेली होती. पण घरी परतली नाही. तिची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर १६ जानेवारीला भागवतटोलाजवळ ती जखमी अवस्थेत आढळली. तिला गंभीर जखमा होत्या आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडून होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण केवळ अपघाताची कलमे लावण्यात आली. याप्रकरणी अपहरण, बलात्कार, हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

अपहरण, बलात्कार, हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला पोलिस अजिबात प्रतिसाद देत नाहीत. म्हणून भोयर दाम्पत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात धावत्या पोलीस वाहनासमोर दोघेही झोपले होते. वेळीच पोलिसांनी त्यांना उचलल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. या घटनेमुळे गोंदिया शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT