Balasaheb-Thakre
Balasaheb-Thakre 
राज्य

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने करणार  : ठाकरे

सरकारनामा

नागपूर : नागपूर ते मुंबई प्रवास जलदगतीने व्हावा, यासाठी समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकाने घेतला होता. त्याची सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला देखील सुरुवात झाली आहे. फडणवीस सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या प्रकल्पाचे आता नामकरण करण्याचे ठरले आहे. आता यापुढे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी जारी केला. त्याचप्रमाणे, या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

साडेतीन हजार कोटी रुपये अनुदान म्हणून देणार
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी गृहमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा महामार्ग "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' या नावाने ओळखला जाणार आहे. त्याचप्रमाणे, या प्रकल्पावरील कर्जाचा भार काही प्रमाणात हलका करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला होता. याही निर्णयासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

अभिमान वाटेल असे काम करणार 
मुख्यमंत्रीनागपूर-मुंबई महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने केले जाईल. या महामार्गावर कृषी समृद्धी केंद्र उभारले जाणार आहेत. याच्या माध्यमातून सुमारे 5 लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. सर्वांना अभिमान वाटेल अशा दर्जाचे काम समृद्धी महामार्गाचे केले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. 21) विधानसभेत दिला.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT