Chandrashekhar Bawankule - Uddhav Thackeray 
राज्य

बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला भरेल एवढे पत्र पाठवणार...

अमरावती येथून आज स्वतः बावनकुळे यांनी पोस्ट ऑफिसमध्ये पत्र टाकत या मोहिमेला सुरुवात केली. देशाचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री ठाकरे यांना माहिती व्हावा, यासाठी हे पत्र आहे.

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे Former Minister of Maharashtra and Union Minister Narayan Rane यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल जे काही विधान केले. त्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभर धुडगूस घातला आणि भाजपच्या कार्यालयांना लक्ष्य करीत तोडफोड केली. अशा शिवसैनिकांवर कारवाई केली नाही, तर भाजप पत्र अभियान राबविणार आहे. इतके पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवू की, त्यांचा वर्षा बंगला अपुरा पडेल, असे भाजप नेते, माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule आज म्हणाले. 

इट का जबाब पत्थर से देंगे...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी अमरावती येथील भाजप कार्यालयावर हल्ला करत भाजप कार्यालय तोडफोड करत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे. जर शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केली नाही तर अमरावतीत मोठं आंदोलन केले जाईल, ‘इट का जबाब पत्थर से देंगे’, असा इशाराही चन्द्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांना भेटून शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली. तर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर मुख्यमंत्री ठाकरे व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशाचा स्वातंत्र्य दिवसाचा कोणता महोत्सव आहे, हे माहिती नाही. त्यामुळे नारायण राणे, तसे बोलले. त्याचे उत्तरही मुख्यमंत्र्यांना त्याच पद्धतीने द्यायला पाहिजे होते. पण शिवसैनिकांनी जो धुडगूस घातला, त्यासाठी त्यांना माफ केले जाणार नाही. 

वर्षा बंगला भरेल इतके पत्र पाठवणार भाजप कार्यकर्ते पाठविणार आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले तर अमरावती येथून आज स्वतः बावनकुळे यांनी पोस्ट ऑफिसमध्ये पत्र टाकत या मोहिमेला सुरुवात केली. देशाचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री ठाकरे यांना माहिती व्हावा, यासाठी हे पत्र आहे असे त्यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT