uday-samant
uday-samant 
राज्य

वाघाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका : उदय सामंत 

सरकारनामा

वैभववाडी : शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे त्या वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा विरोधकांना देतानाच पर्यटनदृष्या गोव्यापेक्षा सरस काम सिंधुदुर्गात केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानतंर उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यांची सुरूवात वैभववाडी तालुक्‍यातुन झाली. येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला.

  पालकमंत्री म्हणुन वैभववाडीत आल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यानी मनापासुन सत्कार केला. हा सत्कार फुकट जाऊ देणार नाही आणि सत्कार केला म्हणुन कार्यकर्त्याना पश्‍चातापही होणार नाही, याची हमी पालकमंत्री सामंत यांनी कार्यकर्त्याना दिली. 


  ते पुढे म्हणाले, कणकवली-देवगड-वैभववाडीचा पुढचा आमदार हा शिवसेना महाविकास आघाडीचा करण्याचा संकल्प निश्‍चित करूनच आजच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. या मतदारसंघात भगवा फडकविणारच . 


या प्रसंगी अरूण दुधवडकर म्हणाले, "संघटनेला प्राधान्य देणारा पालकमंत्री जिल्हयाला मिळाला आहे. संघटनावाढीसाठी पालकमंत्री अधिक वेळ देतील.'' 


अतुल रावराणे म्हणाले, " पालकमंत्री उदय सामंत हे विकासाचा धडाका सर्वश्रुत आहे. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गात सुध्दा ते विकास करतील.'' 


 यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अरूण दुधवडकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, निलम सावंत, दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, पल्लवी झिमाळ, मंगेश लोके, नंदु शिंदे, दिपक पांचाळ, संभाजी रावराणे, अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT