राज्य

छगन भुजबळांच्या विरोधातील शिवसेना नेत्यांची येवल्यात मोर्चेबांधणी सुरू

सरकारनामा ब्युरो

येवला : विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे विरोधक, शिवसेना नेते आत्तापासुनच तयारीला लागले आहेत. विशेषतः जनमानसात चांगली प्रतिमा असलेले माजी आमदार मारोतराव पवार घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. चहा पितांना निवडणुकीची चर्चा करतात. "यंदा शहाणे व्हा. 2014 ची चुक पुन्हा करु नका' असे आवाहन करीत आहेत. 

शिवसेनेचे संभाजीराजे पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी करीत आहेत. माजी आमदार मारोतराव पवार हे त्यांचे काका आहेत. मारोतराव सध्या मतदारसंघातील कार्यर्त्यांशी संवाद दौरा करीत आहेत. या दौऱ्यात पक्षाचा नेता, कार्यकर्ते कोणीच नसते. ते एकटेच दौरा करीत आहेत. कार्यकर्तेही त्यांची उत्साहात स्वागत करतात. विविध गावांत त्यांची नातीगोती, जुना संपर्क व त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी पाहुणचार अन्‌ चहाचे घुटकेघेता घेता ते राजकीय संवाद करतात. यानिमित्ताने भुजबळ विरोधकांची चाय पे चर्चा सुरु झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 

विविध गावांतील संवाद दौऱ्यात त्यांनी आगामी निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीची पुनारावृत्ती होणार नाही, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. मागील निवडणुकीत कळत-नकळत ज्या चुका झाल्या. या गोष्टीवर विचार मंथन न करता आता थेट कामाला लागण्याची वेळ आहे असे सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्यावर ही जबाबदारी वाढली आहे. एकेकाळी ज्यांना विकास पुरुष म्हणून संबोधले जायचे, त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन जनतेने त्यांना तब्बल सलग तीन वेळेस आमदार केले. परंतु, तालुक्‍यातील रस्ते बांधले म्हणजे विकास झाला, असे नाही. तर अजुनही तालुक्‍यातील मुलभूत सुविधा देण्यात त्यांना अपयश आलेले आहे. हे जरी असलं तरी ज्यावेळी निवडणूक झाली, त्यावेळेस मार्केट कमिटीच्या प्रांगणात बैठकीत सांगण्यात आले होते की, मला फक्त पाच वर्ष संधी द्या. त्याला आम्ही केवळ शरद पवार साहेबांच्या शब्दामुळे सहमती दर्शविली होती. तेव्हाही मतदार संघाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असे नेते आपल्या मतदार संघात होते आणि आजही आहेत असे पवार आपल्या गप्पांमध्ये आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. 

संभाजी पवार यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे संकेत "मातोश्री' वरुन आले असल्याचेही माजी आमदार पवार यांनी सांगितले. पवार यांच्या संवाद दौऱ्यामुळे थंडीतही येवल्याचा राजकीय आखाडा तापल्याचे दिसते. आण्णासाहेब गायकवाड, दत्तात्रय आहेर, राजेंद्र गायकवाड, सुभाष गायकवाड, पांडुरंग गायकवाड, निवृत्ती गायकवाड, वाल्मिक शेळके, सुभाष सोनवणे, डी. एम. गायकवाड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT