Vishwas Pathak BJP - Nitin Raut
Vishwas Pathak BJP - Nitin Raut 
राज्य

चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी उडवता, अन् वीज माफीवर यु टर्न…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राज्यातील गरीब जनतेने कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अवाजवी वीज बिल माफीची मागणी केली होती. आम्हीही कित्येकदा १०० युनिट वीज बिल माफी देण्याची मागणी केली. पण ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आणि सरकारने ब्र सुद्धा काढला नाही. मात्र स्वतःच्या बंगल्यावर आणि चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी रुपयांचा खर्च कसा करता, असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाचे मिडिया प्रभारी विश्‍वास पाठक यांनी केला आहे.

ऊर्जामंत्र्यांवर तोफ डागताना पाठक म्हणाले, मुंबई अंधारात गेली होती, त्या घटनेला आता तीन महिने झाले. कारवाई तर दुरच पण चौकशीचा अहवालही अद्याप आलेला नाही. त्यामुळे ऊर्जामंत्री आणि सरकार काम करते की नाही, असा प्रश्‍न साहजिकच पडतो. वाढीव वीज बिलापाई जनता त्रस्त झाली. वाढीव वीज बिलामुळे आत्महत्यासुद्धा झालेली आहे. तरीही सरकारमधील मंत्र्यांना पाझर फुटत नाही. आधी ऊर्जामंत्रीच वीज बिल माफीची घोषणा करतात, नंतर यु टर्न घेतात. तो त्यांच्या नाकर्तेपणामुळे की सरकारमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून, हे सुद्धा कळायला मार्ग नाही. 

ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी अनेक वेळा मुंबई-नागपूर चार्टर्ड प्लेनने प्रवास केला आहे. चार्टर्ड प्लेनची बिले महावितरण आणि महारापारेषण यांच्याकडून भरण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता चार्टर्ड प्लेन ऊर्जामंत्र्यांनी वापरले. त्यावर सुद्धा काही कार्यवाही झालेली नाही. स्वतःच्या बंगल्यावर, मंत्रालयातील कार्यालयावर आणि चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात, मात्र वीज बिल माफीवर यु टर्न घेतात, ही राज्यातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप विश्‍वास पाठक यांनी केला. 

ऊर्जा खात्याच्या महाजेनको निर्मित संचालक पद रिक्त आहे. मात्र त्या ठिकाणी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष नाही. स्वतःच्या सुखसोयी आणि आरामावर कोट्यवधी खर्च करायचे आणि जनतेसाठी काही करायचे असले की हात वर करायचे, असे एकंदरीत ऊर्जामंत्र्यांचे काम असल्याचा घणाघातही पाठक यांनी केला. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT