chandrakant-dada-patil
chandrakant-dada-patil 
राज्य

ग्रामपंचायत निवडणुकसाठी भाजपने कंबर कसली : प्रत्येक जिल्ह्यासाठी या प्रभारींची नेमणूक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून आपल्या कार्यकर्त्यांनी विजयी व्हावे यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बड्या नेत्याची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे प्रभारी पुढील काही दिवसांत आपापल्या जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी आपले कार्यकर्ते निवडून यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यानुसार त्यांनी यादीही तातडीने प्रसिद्धीस दिली. 

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर आणि वर्धा

पंकजाताई मुंडे- बीड

चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर आणि भंडारा

गिरीष महाजन- जळगाव आणि अहमदनगर

आशिष शेलार - ठाणे

रविंद्र चव्हाण - सिंधुदुर्ग

रावसाहेब दानवे पाटील - नांदेड

संजय कुटे- अकोला आणि अमरावती

सुरेश हाळवणकर - सांगली आणि पुणे

सुभाष देशमुख - कोल्हापूर

प्रसाद लाड - रत्नागिरी उत्तर-दक्षिण

प्रविण दरेकर- रायगड उत्तर-दक्षिण

विनोद तावडे - पालघर

गिरीष बापट - सातारा

संजयबाळा भेगडे- सोलापूर 

संभाजी पाटील निलंगेकर- लातूर आणि उस्मानाबाद

प्रितमताई मुंडे - परभणी

बबनराव लोणीकर - हिंगोली

डॉ. भागवत कराड - जालना

जयकुमार रावल- धुळे

प्रा. देवयानी फरांदे-नंदुरबार

प्रा. राम शिंदे - नाशिक

चैनसुख संचेती - यवतमाळ

रणजित पाटील - वाशिम

डॉ. अनिल बोंडे - बुलढाणा

अनिल सोले- गोंदिया

हरिभाऊ बागडे -औरंगाबाद

डॉ. रामदास आंबटकर - गडचिरोली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT