BJP-blunder.
BJP-blunder. 
राज्य

मुख्यमंत्र्यांच्या स्वागत फलकावर 'राष्ट्रवादी'च्या जिल्हाध्यक्षाचा फोटो 

सरकारनामा

बोदवड (ता.भुसावळ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांचा फोटो लावण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेत. भुसावळ तालुक्‍यातील बोदवड येथे उद्या (ता.23) ही यात्रा दाखल होणार आहे. त्या निमित्ताने शहरात स्वागत फलक लावण्यात आले आहेत.

 बोदवड येथे डॉ,बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल चौधरी यांच्या दुकानावरल लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र भय्या पाटील यांचा फोटोही लावण्यात आला आहे. 

 सेल परचेस विभागाकडून हे स्वागत करण्यात आले आहे. सेलपरचेस च्या अध्यक्षपदी भाजपचे रविंद्र वराडे यांनी आहेत. त्यानी या स्वागत फलकावर सर्व संचालकांचे छायाचित्र छापले त्यात संचालक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांचेही छायाचित्र छापले आहे. 

त्यामुळे बोदवड शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, भाजपने हा खोडसाळपणा केला असून जनतेत गैरसमज पसरविण्याचा हा प्रकार आहे असे आरोप त्यांनी केला . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT