BJP MLAs, office bearers boycott Latur DPC meeting 
राज्य

तर जेलभरो आंदोलन छेडू : आमदार संभाजी पाटील निलंगेकर

आगामी काळात महावितरणने तात्काळ डीपी दुरुस्त करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली नसल्यास तीव्र व उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

लातूर : शेतकऱ्यांना डीपी बसवलं जात नसून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने तीव्र विरोध केला. पण, या डीपीसाठी ऑइल उपलब्ध नसल्याचे कारण देत महावितरणच्या वतीने दिरंगाई केली जात असल्याने आमदार संभाज पाटील निलंगेकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडले. महावितरणने तात्काळ डीपी न बसवल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. BJP MLAs, office bearers boycott Latur DPC meeting

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यु पवार, आमदार रमेश आप्पा कराड यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

चालू वर्षी सोयाबीनचा पेरा हा एकूण क्षेत्रापैकी 80 टक्केपर्यंत वाढलेला आहे. सध्या सोयाबीन पीक हे बहरत असतानाच महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळेच सोयाबीन पीक सुकून जात असून उत्पादनात घट येण्याची भीती आहे. यातच महावितरणच्या वतीने गाव खेड्यांत वीज पुरवठा करणाऱ्या डीपी या नादुरुस्त झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीमध्ये महावितरणकडून हलगर्जीपणा व दिरंगाई होत आहे. 

याचा परिणाम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसानीचा ठरणार आहे. यामुळे भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना डीपी तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात विषय मांडला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावर समाधानकारक उत्तर दिले नाही, तसेच अन्य सबब पुढे करत विविध कारणं दिली. 

यामुळे भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यु पवार, आमदार रमेश आप्पा कराड व भाजपाच्या सदस्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर पडले. आगामी काळात महावितरणने तात्काळ डीपी दुरुस्त करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली नसल्यास तीव्र व उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांना डीपी मिळालाच पाहिजे आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली
.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT