Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad
Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad 
राज्य

भाजपने वाढत्या महागाईबद्दलही जनतेचे आशिर्वाद मागावेत..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. (BJP should also seek public blessings for rising inflation.Said, Shivsena Mla Ambadas Danve) शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात केंद्राने दोन मंत्रीपद देत कराड, दानवे यांचे हात बळकट केल्याचे बोलले जात असतांनाच मंत्री झाल्यानंतर या दोन नेत्यांचे ज्या पद्धतीने जिल्ह्यात स्वागत झाले, त्यातून भाजपने शिवसेनेला सूचक इशाराच दिला आहे.

जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करण्यात भाजप यशस्वी झाल्यानंतर शिवसेनेकडून या यात्रेवर टीका करण्यात आली आहे. (Central State Finance Ministrer Dr. Bhagwat Karad) शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी जनआशिर्वाद यात्रेवरून भाजपला लक्ष्य केले आहे. मोदींनी देशातील सर्वसामन्यांसाठी काय केले?  हे सांगतानाच देशात वाढलेली महागाई यासाठी देखील जनतेचे आशिर्वाद मागावेत, असा टोला दानवे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लगावला आहे.

डाॅ. भागवत कराड यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा समारोप काल कन्नड तालुक्यात करण्यात आला. (Shivsena Mla Ambadas Danve, Aurangabad) विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेण्यात आला. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. स्वातंत्र्यांनतर पहिल्यांदा जिल्ह्यांला केंद्रात प्रतिनिधित्व मिळाले, याचा आनंद आणि शिवसेनेला आपली ताकद दाखवण्याची संधी भाजपने सोडली नाही.

शहरात कराड यांच्या स्वागतासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ७५ ठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आले होते.  गेल्या दोन दिवसांपासून संपुर्ण जिल्हा भाजपमय झाल्याचे चित्र होते. त्यामुळे गेली अनेकवर्ष सोबत काम केलेल्या शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याची अनेकांना उत्सूकता होती. त्यानूसार आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून वाढत्या महागाईबद्दल देखील जनतेचे आशिर्वाद मागायला पाहिजे होते, असा चिमटा काढला आहे.

भाजपची जनआशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊ यांनी याआधीच केली होती. त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी देखील भाजपवर तोंडसुख घेतले. दानवे म्हणाले, भाजपचे मंत्री डाॅ. भागवत कराड जिल्ह्यात जनआशिर्वाद यात्रा घेऊ निघाले आहेत. पण त्यांनी वाढत्या महागाईला कोण जबाबदार आहे हे देखील जनतेला सांगावे आणि त्यासाठी देखील आशिर्वाद मागावेत.

देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. ७१ रुपये लिटर असलेले पेट्रोल १०९, साठ रुपये असलेले डिझेल ९८ रुपयांवर तर साडेपाचशे रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज ८७० रुपयांवर पोहचला आहे. या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे तर मोडले आहेच, पण याचा परिणाम हा सर्वप्रकारच्या क्षेत्रात महागाई वाढण्यावर होणार आहे. मग याला कोण जबाबदार आहे? हे देखील जनआशिर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपने जनतेला सांगितले पाहिजे. महागाई वाढवल्याबद्दल देखील जनतेचे आशिर्वाद मागितले पाहिजे, असेही दानवे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT