Amit shah sarkarnama
राज्य

भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार; सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री शहांना पाठवले पत्र

सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, असे चंद्रकांत पाटील Chandrakant Patil) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असा इशारा भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला.‌ ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, " सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणे, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला आहे. तसेच, सर्व पुरावे दिले असून या प्रकरणी लक्ष घालण्याची त्यांना विनंती केली आहे.

सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याही क्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपानंतर माननीय उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश दिले. आता परमवीर सिंह आणि देशमुख यांच्या ईडीला (ED) दिलेल्या जबाबातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची नावे येत आहेत. त्याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त सामनामधून प्रकाशित करण्यात आल्याने पाटील म्हणाले की,"सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादक पद सोडलं आहे का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT