Chandrakant Patil Sarkarnama
राज्य

ST कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत आंदोलकांना भाजप शिधा पुरवणार

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीेका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : सुमारे दोन महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांनी एसटीचे (ST) शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा रविवारी (ता.16 जानेवारी) कोल्हापुरात केली आहे. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसह भेट दिली व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप केला.

पाटील म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली. तेव्हा १९ महिन्यांच्या त्या कालावधीत अनेकांना तुरुंगात घातले गेले. माझ्या सासऱ्यांनाही त्यावेळी तुरुंगवास सोसावा लागला. अशा परिस्थितीत पत्नीने नेटाने घर सांभाळले. अनेकांनी घर सावरण्याचा प्रयत्न केला. आणीबाणी लादण्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर जनता पक्षाचे सरकार आले. त्यातून हम करे सो कायदा या देशात चालत नाही, असे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारची ताठर भूमिका जास्त काळ चालणार नाही. आंदोलन लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून हैदोस सुरू आहे. यांचे काही तरी नक्की होणार आहे. अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल, असे साकडे देवीला घातले. शिधावाटप झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. यावेळी आंदोलनकर्त्या काही कर्मचाऱ्यांनी सरकार आमच्या रक्ताने थंड होणार असेल तर, त्यासाठी आहुती देण्यास तयार आहे, असे डोळ्यात अश्रू आणून सांगत होते. त्यावर पाटलांनी त्यांची समजूत काढतांना शासनाशी भांडू आणि न्याय मिळवू मात्र, हिंसाचार करू नका, अशा शब्दात कर्मचाऱ्यांची समजूत काढली. तसेच, हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानाने कामावर जावे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT