Karad Corona Meeting
Karad Corona Meeting 
राज्य

शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली शरद पवारांची विशेष भेट; अनेकांच्या भुवया उंचावल्या

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : दोन जिल्ह्याचा कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष हेलिकॉप्टरने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कऱ्हाडात आगमन झाले. त्यानंतर ते गाडीने शासकिय विश्रामगृहात आले. त्यापूर्वी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच गाडीतून आले. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवार यांची विशेष भेट घेऊन त्यांच्याशी पंधरामिनिटे चर्चा केली. त्यामुळे तेथे उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

 कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने कऱ्हाडात आगमन झाले. येथील शासकिय विश्रामगृहात खासदार शरद पवार थोडावेळ थांबले होते. सकाळपासूनच या बैठकीच्या निमित्ताने कऱ्हाडातील टाऊन हॉलमध्ये विविध जिल्ह्यातील नेते व लोकप्रतिनिधी येत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे ही यापूर्वीच विश्रामगृहात येऊन थांबले होते.  त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच गाडीतून   विश्रामगृहाच्या ठिकाणी दाखल झाले. तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांची विशेष भेट घेतली. त्यामुळे तेथे उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. पवार यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. नेमकी कोणत्या विषयांवर काय चर्चा झाली हे मात्र, समजू शकले नाही. त्यानंतर उपस्थित सर्व नेते व लोकप्रतिनिधी बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT