Bjp Tount to Minister Amit deshmukh news Parbhani
Bjp Tount to Minister Amit deshmukh news Parbhani 
राज्य

उस्मानाबादचे प्रेम समजु शकतो, पण विलासरावांसारखा शेजार धर्मही पाळा : अमित देशमुखांना भाजपचा चिमटा

गणेश पांडे

परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी परभणी जिल्हा सर्व निकषात बसत असतांनाही उस्मानाबाद येथील महाविद्यालयास परवानगी मिळते आणि परभणीची संचिका खाली ठेवण्यात येते. अमितभय्या उस्मानाबादवरील तुमचे प्रेम मी समजु शकतो. परंतू (कै.) विलासरावांसारखा शेजार धर्मही पाळण्याचा गुण आपण आत्मसात करावा, असा सल्ला भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिला.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळावी यासाठी परभणीकर संघर्ष समितीकडून प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसापूर्वीच परभणीचे खासदार संजय जाधव, भाजप आमदार मेघना बोर्डीकर, कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, परभणीकर संघर्ष समितीच्या संयोजक खासदार फौजिया खान, माजी आमदार अॅड.विजयराव गव्हाणे यांनी जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती.

या तीन्ही बैठकांमध्ये समितीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील समितीच्या मागणीवरून परभणीतील गो संरक्षणाची जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे परभणीचे वैद्यकीय महाविद्यालय आता पूर्णत्वास येणार असे दिसत होते. परंतू अचानक उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

य परभणीकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून भाजपचे  अॅड.विजय गव्हाणे यांनी अमित देशमुखांना चिमटा काढला. गव्हाणे म्हणाले, परभणीकरांना संघर्षाशिवाय काहीच मिळालेले नाही. आम्ही पूर्ण निकषात बसत असतांनाही आम्हाला डावलेल जात आहे. उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर केले त्याचे आम्ही निश्चितपणे स्वागत करतो. 

मंत्री अमीतभय्यांनी त्यांचा राजकीय हट्ट जरूर पूर्ण करावा, परंतू गरज देखील ओळखावी, शिफारसी तपासाव्यात. मंत्री अमित देशमुखांचे उस्मानाबादवरील प्रेम मी समजु शकतो. परंतू (कै.) विलासराव देशमुखांचा वारसा चालवितांना शेजार धर्म ही त्यांनी पाळला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी देखील परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचा शब्द दिला होता. त्यांनी सुध्दा या मागणीची गांभीर्याने दखल घेतली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 जनआंदोलन उभारणार

परभणी ही संघर्षाची भूमी आहे. त्यामुळे येथील जनतेला संघर्षाचे पाऊल उचलावे लागणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी आपण १८ ते २० जानेवारी दरम्यान परत एकदा मुख्यमंत्र्यासह सर्व नेत्यांच्या भेटी घेणार आहोत. त्यानंतर २६ जानेवारीपासून उग्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही गव्हाणे यांनी दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT