Fir File Aginst Mla Ratnakar Gutte- Parbhani News
Fir File Aginst Mla Ratnakar Gutte- Parbhani News  
राज्य

आमदार रत्नाकर गुट्टेसह वीस जणांवर गुन्हा दाखल

राजेश काटकर

परभणी ः गंगाखेड आगारातील चालकांना ड्युटीसाठी मुंबईला बोलवू नका, अशी मागणी करत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी वीस ते पंचवीस समर्थकांसह ३१ मार्च रोजी गंगाखेड आगारात आंदोलन केले होते. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुट्टे यांच्यासह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

राज्यात व मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्ण संख्या आणि मृतांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात तर लाॅकडाऊन लावण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचे संकट पाहता परिवहन विभागाने अनेक जिल्ह्यातील बसचालकांना मुंबईत ड्युटीवर बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. गंगाखेड आगारातून देखील अनेक चालकांना मुंबईला ड्युटीवर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कुणीही मुंबईला ड्युटीसाठी जाण्यास इच्छूक नाही.

गंगाखेड आगारातील एसटी चालकांची ही व्यथा ओळखून आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ३१ मार्च रोजी रात्री गंगाखेड आगारात जाऊन या संदर्भात आंदोलन केले होते. गंगाखेड आगारातील एकाही चालकाला  मुंबईला ड्युटीसाठी पाठवू नये, अशी मागणी गुट्टे व त्यांच्या समर्थकांनी केले होते.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी टाळेबंदी घोषित केलेली आहे. असे असतांना डॉ. रत्नाकर गुट्टे,नगरसेवक राधाकिसन शिंदे, नगरसेवक सत्यपाल साळवे, प्रताप मुंडे, सुरेश बंडगर व इतर पंधरा ते वीस कार्यकर्ते व दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या प्रकरणी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या आदेशानुसार गंगाखेड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT