राज्य

सक्षम महिलांना उमेदवारी द्यायला हवी : चाकणकर

सरकारनामा ब्युरो

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात सक्षमपणे काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली. राज्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यात विविध ठिकाणी अनेक महिला पदाधिकारी मोठ्या निर्धाराने काम करीत आहेत. या महिलांच्या कामाची पक्षाने दखल घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

राज्यात दिवसागणिक महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला विभागाच्या वतीने निर्भया सखी हे पथक तसेच टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निर्भया सखी हे पथक प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात येणार असून त्यातून महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना तसेच आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करील. त्याशिवाय विविध शासकीय योजनांचा हक्क मिळवून घेण्याबाबतही मार्गदर्शन केले जाईल, असेही चाकणकर यांनी सांगितले. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरातून आलेल्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीविषयी मार्गदर्शन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT