राज्य

सीमेवरील जवानांना रसद पुरवतेय चंडीगढची वीरांगना...

सरकारनामा ब्युरो

चंडीगढ : संरक्षणदलात जायची अशी तिची महत्वाकांक्षा नव्हती पण इंजिनीयरिंग करताना एकदा महाविद्यालयाच्या आवारात संरक्षण दलातले अधिकारी आले होते त्यांना पाहून तिच्या मनाने लष्करी सेवेत जायचे घेतले त्यासाठी ती प्रयत्न करू लागली. अभ्यासक्रम पूर्ण करून इंजिनीयरिंगची पदवी मिळाल्यावर ती परीक्षा देऊन हवाई दलात दाखल झाली आणि तिथले ट्रेनिंग पूर्ण करत अधिकारी म्हणून काम करू लागली. सीमेवरील जवानांना विविध गोष्टीच्या पुरवठा करणाऱ्या विमानांमध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून ती काम करू लागली आहे. ही कुठली नवल कथा नसून हिना जायस्वाल या चंडीगढमधील तरुणीची प्रेरक कथा आहे. फ्लाईट ऑफीसर ची परीक्षा प्रथमच सगळ्यांसाठी खुली झाली होती आणि त्यात सहाजणाची निवड झाली त्यात हिना ही एकमेव मुलगी आहे. 

आज तिच्या तुकडीत तीच एक महिला अधिकारी आहे. तिच्या प्रवासाबद्दल ती म्हणते तुम्हाला तुमच्या क्षमता सिद्ध कराव्याच लागतात, मला माझे काम जबाबदारीने करावे लागते आणि त्यात मला आनंद आहे. मला कोणेएकेकाळी अभिनेत्री व्हायचे होते पण मी स्वतः हा पर्याय निवडला आहे. तिचे वडील म्हणतात तिचा हा जॉब आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT