balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg 
राज्य

थोरातांच्या मतदारसंघातील या गावचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले कौतुक

सरकारनामा ब्युरो

नगर : कोरोनाचे संटक ओळखून ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध केली. गावाने एकोप्याने कोरोनाशी सामना केला. गेल्या 15 दिवसांपासून एकही रुग्ण नाही. त्यामुळे गाव कोरोनामुक्त करून बक्षिस मिळविणार, असा निर्धार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदारसंघातील निमगाव बुद्रुकचे (ता. संगमनेर) येथील सरपंच प्रकाश कानवडे यांनी व्यक्त केला. (Chief Minister Thackeray appreciated this village in Thorat constituency)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे झालेल्या मिटिंगमध्ये सरपंचाने आपल्या गावची माहिती सांगतली. याला ठाकरे यांनी दाद देत गावाचे कौतुक केले.

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. त्यात निमगाव बुद्रुकचे सरपंच कानवडेंना प्रथम संधी मिळाली. त्यांनी गावाच्या कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची, त्यासाठी गावातील व्यक्तींनी, प्रशासनाने केलेल्या सहकार्याची माहिती दिली.

ते म्हणाले, 'कोरोनाचं संकट वाढत असतानाच गावची निवडणूक लागली. मात्र, गावकऱ्यांनी विचार करुन ही निवडणूक बिनविरोध केली. सरपंच निवडणूकही बिनविरोध झाली. त्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र आलो. माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत पथके स्थापन करुन सर्वेक्षण सुरु केले. दहा टीम करुन पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करत होतो. संशयितांना जिल्हा परिषद शाळेत भरती केले. नंतर त्यांच्या चाचण्या करुन बाधित आलेल्या रुग्णांना लोकसहभागातून सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले. ज्या व्यक्ती त्या सेंटरमध्ये दाखल होण्यास कचरत होत्या त्यांना तालुक्याच्या गावी पाठवले. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सीसीटीव्ही बसवले. त्याचा चांगला परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली.

गावात स्थापन केलेल्या पथकांनीही चांगले काम केले. आरोग्य समिती बरोबरच खासगी डॉक्टर्स, माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मदतीला आले. सर्वांनी विनामुल्य सहभाग दिला. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचेही मोठे योगदान कोरोनामुक्ती मध्ये ठरल्याचे कानवडे यांनी सांगितले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावांना प्रोत्साहन दिले. राज्य शासनाने आता कोरोनामुक्त गावांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे.  या स्पर्धेत निश्चितपणे सहभागी होऊन बक्षीसही मिळवू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT