<div class="paragraphs"><p>Omicron Variant</p></div>

Omicron Variant

 

Sarkarnama

राज्य

चिंता वाढली : Omicron चा पहिला बळी गेलेल्या शहरात करोनाची रुग्णसंख्या झाली तिप्पट

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट शमली असे वाटत असताना वर्षअखेरीस या साथीने पुन्हा जोरदार उचल खाल्ली आहे. गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) पन्नासच्या आत आलेला दररोजचा कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी (ता.२ जानेवारी) पावणे दोनशे झाला. काही दिवसांतच दररोजच्या कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत तिप्पटीहून अधिक वाढ झाल्याने पालिका प्रशासन पुन्हा अधिक सतर्क झाले आहे. डेल्टा कोरोनाबरोबर या साथीचा ओमीक्रॉन (Omiceon) या नव्या उत्परिवर्तीत विषाणूचे रुग्णही शहरात वाढू लागले आहेत. रविवारी निव्वळ ओमीक्रॉनचे पाच पेशंट मिळून आले. त्यामुळे या कोरोना रुग्णांचा आकडा ३३ झाला आहे. देशातील ओमीक्रॉनचा पहिला बळी हा पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच (ता.२९ डिसेंबर) गेला आहे

ओमीक्रॉन येण्यापूर्वी शहरातील कोरोना रुग्णसंख्या पन्नासच्या आत आली होती.पण,आता ती पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. त्यातून तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. काल म्हणजे शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ओमीक्रॉनसह कोरोनाचे एकूण १०२ रुग्ण आढळले होते. आज हा आकडा पावणेदोनशे झाला. तर, ओमीक्रॉनचा दररोजची संख्या सुद्धा दुप्पट (५) झाली. ओमीक्रॉनचा नव्याने प्रार्दूभाव झालेल्यांत दोन पुरुष आणि तीन महिला आहेत.विशेष म्हणजे रॅंडम तपासणीत ते मिळून आले आहेत.आतापर्यंत परदेशातून आलेल्या १६५६,तर त्यांच्या संपर्कातील २८ जणांची कोरोना चाचणी पालिकेने केली. त्यात ६९ जणांना कोरोना झाल्याचे दिसून आले. त्यात परदेशातून आलेल्यांतील १४ आणि त्यांच्या संपर्कातील ११ जणांना ओमीक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना ओमीक्रॉन होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.दररोजच्या नव्या कोरोना रुग्ण वाढीमुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्येने आता साडेचारशेचा टप्पा (४६८) रविवारी ओलांडला.

दरम्यान,ओमीक्रॉन या वेगाने प्रसारित होणाऱ्या कोरोनाने पिंपरी पालिका प्रशासनाची झोप उडवली आहे. दररोजची कोरोना रुग्णसंख्या तिपटीहून अधिक झाल्याने पालिका आयुक्तांनी सामाजिक,राजकीय, धार्मिक कार्यक्रमाला पन्नासच्या उपस्थितीची मर्यादा टाकली आहे.दशक्रियाविधी व अंत्यसंस्कार पुन्हा एकदा वीसजणांच्य़ा हजेरीतच करण्यास सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT