Congress Activites Arrest by Police News jalna
Congress Activites Arrest by Police News jalna 
राज्य

दानवेंचा काॅंग्रेसला इथेही चकवा; कार्यक्रम उधळण्याआधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात..

लक्ष्मण सोळुंके

जालना ः केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे आज अंबड दौऱ्यावर आहेत. अंबड शहरातून त्याची मोटार सायकल रॅली आणि शहरातील पंडित जळगावकर नाट्यगृहात सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. (Congress Activists in police custody before the event was disrupted ) पण हा कार्यक्रम काही कॉंग्रेस कार्यकर्ते उधळून लावण्याच्या तयारीत होते.

याची कुणकुण लागताच पोलिसांनी एका हॉटेल मधून या कार्यकर्त्यां ताब्यात घेतले आहे. राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहीर असलेल्या दानवेंनी आज पुन्हा काॅंग्रेसला चकवा दिल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना मोकाट सांडाशी केल्यापासून रावसाहेब दानवे वादात सापडले आहेत. काॅंग्रेसने ठिकठिकाणी दानवे यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. (Central State Railway Minister Raosaheb Danve) दानवे यांच्या विरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचे नियोजन देखील काॅंग्रेसकडून सुरू आहे.

त्याचाच एक भाग म्हणून अंबड येथील दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत असलेल्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेताच कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी  केली.  संभाजी गुढे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांची पोलिसांनी अंबड पोलिस ठाण्यात रवानगी केली आहे. जन आशीर्वाद यात्रे दरम्यान बदनापूर येथील कार्यक्रमात  रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतानांच राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.

त्यांची तुलना गावात फिरणाऱ्या मोकाट सांडाशी करून ते कोणत्याच कामाचे नसल्याचे म्हटले होते.  दानवे यांच्या या विधानानंतर  जिल्ह्यासह राज्यात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT