hasan-mushrif-final.jpg
hasan-mushrif-final.jpg 
राज्य

नगरच्या लाॅकडाऊनबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतला हा निर्णय

मुरलीधर कराळे

नगर : नगर शहरात वाढते रुग्ण लक्षात घेता लाॅकडाऊन असावे, या मागणीबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने मनाई केल्यामुळे नगर शहरात लाॅकडाऊन करता येणार नाही, मात्र स्थानिक पातळीवर नेत्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. त्यात प्रशासनाचा सहभाग नसेल, असे सांगितले. त्यामुळे लाॅकडाऊनबाबत आता आमदार संग्राम जगताप व महापाैर बाबासाहेब वाकळे हेच निर्णय घेऊ शकतील.

पालकमंत्री मुश्रीफ आज नगरला आले होते. त्यांनी कोरोनाविषयक आढावा घेतला. स्थानिक पातळीवर रुग्ण रोज वाढत आहेत. रोज 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असून, सुमारे 20 तरी व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. तसेच जिल्ह्यात श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदे, जामखेड आदी शहरांत स्थानिक नेत्यांनी लाॅकडाऊन केले आहे. त्यात प्रशासनाचा मात्र सहभाग नाही. स्थानिक पातळीवर काही पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांकडून लाॅकडाऊनबाबत मागणी होत आहे. याची माहिती मुश्रीफ यांना देण्यात आली.

याबाबत बोलताना ते म्हणाले, की जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर आधी 2 दिवस व नंतर 3 दिवस बाजारात मोठी गर्दी होते. त्याचा परिणाम रुग्ण वाढण्यावर होतो. साहजिकच लाॅकडाऊनचा काहीच उपयोग होत नाही. आमचा कोल्हापूर व कागलचा अनुभव तेच सांगते. त्यामुळे आगामी काळात कुठेही लाॅकडाऊन होणार नाही. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांनी ठरविल्यास ते लाॅकडाऊन करू शकतात. माझे कुटुंब या मोहिमेत कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यासाठी जिल्ह्यात 6 हजार 500 बेड तयार ठेवले आहेत. त्यामुळे प्रशासन त्यासाठी सज्ज असेल.

जिल्ह्यात खासगी डाॅक्टर काम बंद करू शकत नाहीत. त्यांच्या विरुद्ध अत्यावश्यक सेवा कायदा - मेस्मा लागू केला जाईल. तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाॅल उपलब्ध करून दिल्यास कोविड सेंटर सुरू केले जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT