Bjp Mla Prashant Bamb birthday wish to devendra Fadanvis News Aurangabad
Bjp Mla Prashant Bamb birthday wish to devendra Fadanvis News Aurangabad 
राज्य

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटलेले नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस..

(प्रशांत बंब, भाजप आमदार-गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा)

औरंगाबाद ः एक अच्छा नेता या तो रास्ता तलाश लेता है, या तो बना लेता है, बहाने नही बनता, या उक्तीला साजेसे असे नेतृत्व म्हणते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस. (Devendra Fadnavis is a leader who has worked hard for the overall development of Maharashtra.) कुठलेही कारण, अडचण न सांगता राज्याच्या जनतेसाठी, विकासासाठी अहोरात्र झटून धोरण आखणारा आणि त्याची प्रभावी अंमलबाजवणी करणारा नेता म्हणून देखील फडणवीस यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

समाजातील प्रत्येक घटक मग तो शेतकरी, कामगार, उद्योजक असो कि वंचित घटक या सर्वांसाठी दळणवळण, आरोग्य, रोजगार, निवारा व अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध करून धोरणं आखली, अनेक योजना आणल्या आणि विकासाला गवसणी घातली. (Bjp Mla Prashant Bamb, Gangapur,Aurangabad) त्यांनी सुरू केलेली पोखरा योजना तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारी ठरत आहे.

मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, त्यामुळे निर्माण होणारी नापिकी आणि पाणीटंचाईच दुर्भिक्ष कायमचे नाहीसे करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस यांनी मराठवाडा वाॅटरग्रीड सारखी योजना आणली. (Leader of opposision Devednra Fadanvis, Maharashtra) ती शेतकऱ्यांसाठी व तहानलेल्या मराठवाड्यासाठी संजिवनी ठरणार आहे. या शिवाय जलयुक्त शिवार ही योजना या राज्याला आणि मराठवाड्याला टॅंकरमुक्तच्या दिशेने नेणारी एक महत्वाकांक्षी आणि यशस्वी योजना ठरली.

अनाथ मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण, मुख्यमंत्री सहायता निधीमधून राज्यातील लाखो गोरगरिब रुग्णांवर केेले उपचार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. असंघटित कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कामगार कल्याण योजना राबवण्याचे श्रेय देखील फडणवीस साहेबांनाच जाते. कुठल्याही राज्याचा विकास हा तेथील दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो. ही गरज ओळखूनच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची कल्पना पुढे आली.

नागपूर-मुंबई महामार्गाने समृद्धी..

यावर फडणवीस सरकारच्या काळात ज्या वेगाने काम झाले, त्याचेच फलित म्हणजे आज समृद्धी महामार्ग पुर्णत्वाला येत आहे. नागपूर-पुणे मेट्रो लाईनचा प्रकल्प हा देखील दळणवळण बळकट करण्याचाच एक भाग आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम, उत्तर अशा सर्व राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेऊनच फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात सर्वांधिक विदेशी गुतंवणूक आणली. औद्योगिक भरभराट होऊन औद्योगिक विकासात आपले राज्य वरच्या स्थानावर पोहचले, याचे श्रेय खऱ्या अर्थाने आमच्या नेतृत्वाला जाते.

राजकारणात कोणाताही नेता हा जन्मतःच सत्ता, पद घेऊन येत नसतो. कठोर मेहनत, संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तो यश संपादन करत असतो. फडणवीस यांनी देखील त्यांना मिळालेल्या शक्ती आणि अधिकारांचा योग्य वापर करत प्रामाणिकपणे, सातत्य आणि संयमाच्या जोरावर आपले नेतृत्व विकसित केले. या बळावरच त्यांनी राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला.  त्यांचे हे कार्य आणि गुण या मुळेच ते महान ठरतात. अशा या माझ्या नेत्यास वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा..

शब्दांकन ः जगदीश पानसरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT