Diwakar Raote taunts Council Members over use of Marathi
Diwakar Raote taunts Council Members over use of Marathi 
राज्य

स्वाक्षरी इंग्रजीत, मराठीचा आग्रह, दिवाकर रावतेंचा टोला

सरकारनामा ब्युरो

नागपूर : विधान परिषदेच्या हजेरी पुस्तकावर इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करता आणि सभागृहात मराठी भाषेच्या सक्तीचा मुद्दा लावून धरता, असे म्हणत शिवसेनेचे जेष्ठ नेते दिवाकर रावते यांनी काही सदस्यांना अप्रत्यक्षपणे टोला मारला.

मंत्री आणि राज्यमंत्री असे मराठीत शब्द असताना 'कॅबिनेट' मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत, असे शब्द सहजपणे उच्चारता. प्रथम हा इंग्रजीपणा घालवा, असे सांगून मराठी भाषेच्या सक्तीचा मुद्दा लावून धरणाऱ्यांना रावतेंनी कानपिचक्‍या दिल्या.

शिक्षणात मराठी भाषेची सक्तीच्या मुद्यावरुन विधान परिषदेत विरोधक व सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घातला जात असताना शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि सदस्य दिवाकर रावते बोलण्यासाठी उभे झाले. मराठी सक्तीचा मी समर्थक आहे. भविष्यातही राहील, पण इंग्रजीत हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करणाऱ्यांनी मराठी सक्तीचा आग्रह धरु नये. एखाद्या विषयावर चर्चा करताना मुद्‌द्‌याला धरुन उत्तर द्या ऐवजी 'स्पेसिफिक'' या शब्दाचा प्रयोग आपण करतो. असे असताना मराठीचा आग्रह का? करता असा प्रश्‍न उपस्थित केला. भाषणात नियमित वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दाची आठवण करुन देत इंग्रजी शब्दाचा प्रयोग करणाऱ्यांना टोमणे मारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT