Bjp Mp Chatrapati Sambhajiraje- Maratha Youth News Aurangabad
Bjp Mp Chatrapati Sambhajiraje- Maratha Youth News Aurangabad 
राज्य

हिंमत हारू नका, असा मार्ग निवडू नका; मराठा तरुणांना आवाहन..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या निराशेतून जालना जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेने छत्रपती संभाजीराजे हादरून गेले आहेत. त्यांनी सरकारने आता तरी जागे व्हावे, (Do not be discouraged, do not choose this path; Chhatrapati Sambhaji Raje's appeal to Maratha youth) असे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. समाजने खचून जाऊ नये, आपण धैर्याने लढा देऊ, असे आवाहन देखील संभाजीराजे यांनी केले आहे.

परतूर तालुक्यातील येनोरा ( जि. जालना ) येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. (Bjp Mp Chhatrapati Sambhajiraje) आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे.

या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. (Maratha Reservation Maharashtra) त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही.

वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे. आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे.  प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत.

एकजुटीने लढा देऊ..

सरकारला माझी सूचना आहे, कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी.

सदाशिव भुंबर यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाजातील तरूणांना मी कळकळीची विनंती करतो की, मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे, तुमचे धैर्य हिच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिम्मत हरू नका, असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ, असे कळकळीचे आवाहन देखील संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये केले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT